Ad will apear here
Next
शासकीय वास्तूने अनुभवला अनोखा कौटुंबिक सोहळा
वैशाली आणि दीपक यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित अधिकारी वर्ग

जळगाव : वैशाली ही सरकारी बालगृहात वाढलेली मुलगी. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने जळगावच्या निरीक्षणगृहातच ती वाढली आणि सज्ञानही झाली. लहानपणी काळाचा खूप मोठा आघात सोसलेल्या वैशालीचे नवे आयुष्य आता सुरू झाले आहे. चितोंडा (ता. यावल, जि. जळगाव) गावच्या दीपक पाटील या मुलाने तिच्याशी विवाह केला आहे. 

चार मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी या दाम्पत्याने गृहस्थाश्रमात प्रवेश केला. एरव्ही केवळ शासकीय वास्तू म्हणून पाहिले जाणारे बालगृह गुरुवारी एखाद्या मंगल कार्यालयाप्रमाणे नटले होते. गजराच्या घंटेऐवजी तेथे सनई-चौघडे वाजत होते. खास जळगावच्या पद्धतीतील वरण, पोळी, वांग्याची भाजी असे सुग्रास भोजन होते. बालगृहाची वास्तूही जणू वैशालीच्या जीवनातील या आनंदाच्या क्षणासाठी नटली होती.

दीपक हा सुभाष गंगाराम पाटील यांचा सुपुत्र आणि वैशाली ही अमळनेर येथील सुभाष बाळकृष्ण दहिवदकर यांची सुकन्या. आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्याने वैशाली जळगावच्या निरीक्षणगृहातच लहानाची मोठी झाली. तिचा भाऊ सौरभही बालगृहातच वाढतोय. जळगाव जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटनेतर्फे मुला-मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह चालवले जाते. तेथे या मुलामुलींचे स्वतंत्रपणे संगोपन होते. सज्ञान झालेल्या वैशालीसाठी दीपकचे स्थळ आले आणि योग जुळला आणि ठरल्याप्रमाणे हे शुभमंगल यथासांग पार पडले. 

समाजातील महिला व बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कार्यकर्त्या, महिला समाजसेविका आदींचीही या वेळी आवर्जून उपस्थिती होती. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अधीक्षक सारिका मेतकर, जयश्री पाटील, पांडुरंग पाटील आदी अधिकारी, तसे जिल्हा परीविक्षा व अनुरक्षण संघटनेचे सर्व सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते. वैशालीची पाठवणी करताना बालगृहातील तिच्या मैत्रिणी, अधीक्षिका आणि बालगृहातील कर्मचारी अशा सर्वांचेच डोळे पाणावले होते. एकंदरीत या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने गुरुवारी बालगृहाच्या शासकीय वास्तूने एक अनोखा कौटुंबिक सोहळा अनुभवला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZTVBC
Similar Posts
‘शेतकऱ्यांनी उत्पादनाचे मार्केटिंग करावे’ कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) : ‘शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच मालाचे स्वतः मार्केटिंग करावे. गटशेतीद्वारे ते शक्य आहे. विविध ठिकाणच्या बाजारपेठांची माहिती घेऊन रिटेलमध्ये माल विक्री केल्यास आपल्या पानांना चांगल्याप्रकारे कसा भाव मिळू शकतो यासाठी गात तयार करून काही होतकरू तरुण शेतकऱ्यांनी सुरुवात करावी,’ असे ‘आत्मा’चे संचालक शिवाजी आमले यांनी सांगितले
सोशल मीडिया ‘सोशल मीडिया’ या पुस्तकाचा अल्प परिचय....
सारंग बारीला पीएचडी प्रदान जळगाव : सारंग बारी या विद्यार्थ्याला ‘केमिकल टेक्नॉलॉजी’ या विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली. सारंगने ‘स्टडीज ऑन डेव्हलपमेंट ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर पोझिटस्’ या विषयावर प्रा. सत्येंद्र मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते त्याला घोषणापत्र देण्यात आले
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language